नाशिक : महिनाभरात 640 अवैध धंद्यांवर कारवाई

नाशिक : महिनाभरात 640 अवैध धंद्यांवर कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अवैध धंद्यांवर नियमित कारवाई सुरू असून, अमली पदार्थांची वाहतूक-विक्री करणारे, दारूबंदी, जुगार, गुटखा, अवैध शस्त्रे बाळगणे, यांच्यावर तसेच हॉटेलवर कारवाई केली जात आहे. त्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली असून, त्यांनी 30 दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी कारवाई करीत 640 गुन्हे दाखल करून 78 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचप्रमाणे एक कोटी रुपयांचे अवैध बायोडिझेल हस्तगत केले आहे.

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक ग्रामीण भागातून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, इतर अधिकारी, पोलिस ठाणेनिहाय निरीक्षकांची पथके व स्थानिक गुन्हे शाखांची पथके 24 तास कार्यरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अवैध धंदेचालक, मालकांसह जुगार्‍यांचे धाबे दणाणले आहे. कारवाईत सातत्य असल्याने महिनाभरात कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून, महामार्गावरील हॉटेल – ढाबे तपासणीसह ग्रामीण भागातील अवैध अड्डे उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. अवैध मद्याची वाहतूक, अतिदुर्गम भाग, जुगार – मटक्यांची ठिकाणे व हातभट्ट्यांची गोपनीय माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई केली जात आहे. जुगार खेळणारे व खेळविणार्‍यांची धरपकड केली जात आहे. नागरिकांनी अवैध धंद्यांच्या तक्रारीसाठी 6262256363 या क्रमांकावर संपर्क साधावा, तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

1 कोटीचे बायोडिझेल…
जिल्ह्यात अवैध बायोडिझेलच्या साठ्यावरही धडक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये पाच संशयित आहेत. या गुन्ह्यात एक कोटी एक लाख 68 हजार 248 रुपयांचे बायोडिझेल जप्त करण्यात आले आहे, तर अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रक जप्त करण्यात आला. त्यात एक संशयित व चार लाखांचा मुद्देमाल आहे.

गुन्हे व कारवाईचे स्वरूप असे…
गुन्ह्याचे नाव                    दाखल गुन्हे      संशयित        जप्त मुद्देमाल
दारूबंदी                          21                   536              48,52,906 (11 वाहने, 8 मोबाइलसहित)
अमली पदार्थ(एनडीपीएस)   04                  06                 16,95,064
जुगार                               102                163               11,30,750
गुटखा विक्री                       05                  05                1,31,148
घातक शस्त्र बाळगणे           06                  07                05 (पिस्तूल, 7 जिवंत काडतुसे, 4 तलवारी)
हॉटेल, ढाबा कारवाई           02                   02                00
एकूण                              640                 719               78,10,768

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news