आळंदी : दुचाकी चोरणारा सराईत गजाआड | पुढारी

आळंदी : दुचाकी चोरणारा सराईत गजाआड

आळंदी; पुढारी वृत्तसेवा : दुचाकी चोरणार्‍या सराईत आरोपीला आळंदी- पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडील पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि. 2) आळंदी येथे केली आहे. नासीर शमशुद्दीन शेख (वय 36, रा. खेड, मुळ गाव गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित नासीर हा सोळु गावातील रॉयल हॉटेलसमोरु चोरीच्या दुचाकीवर बसला असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीवरून जाणार्‍या नासीर याला अडवून चौकशी केली. त्याने ही दुचाकी 27 नोव्हेंबर रोजी धानोरे येथील पेशवाई हॉटेल समोरून चोरल्याचे कबुल केले.

पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आळंदी, दिघी, तळेगाव दाभाडे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून 2 लाख 55 हजार रुपयांच्या 8 दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यातील पाच गुन्हे उघडकीस आले असून तीन गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नाही. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत. ही कारवाई आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल गोडसे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) रमेश पाटील, पोलिस उपनिरीक्षक जोंधळे, आर. एम. लोणी, पोलिस हवालदार बी. बी. सानप, पोलिस नाईक बी. व्ही. खेडकर, पोलिस जवान एन. के. साळुंखे, के.सी. गर्जे, जी. व्ही. आडे, व्ही. आर. पालवे यांनी केली.

Back to top button