नाशिक : शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे – कृषीविभाग | पुढारी

नाशिक : शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र यावे - कृषीविभाग

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शेतकर्‍यांनी गट कंपन्यांच्या माध्यमाने एकत्रित येऊन विकास साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले. शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम तालुक्यातील मोह या गावातून सुरू करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.

कृषी अधिकारी महेश वेठेकर, अशोक बागूल, अशोक अल्हाट नारायण अहिर, गायकवाड, कृषी पर्यवेक्षक रणजित आंधळे, जोशी अनिल दातीर, युवराज निकम, कृषी सहायक शंकर बिन्नर, चेतन नागरे, आबासाहेब भगत, सुरेश शेळके, महेश गरुड, संध्या दये, जयश्री आखाडे, प्रदीप भोर आदी उपस्थित होते. संजीवनी शेतकरी बचत गटाच्या प्रक्षेत्रावर आयोजित कार्यक्रमात वाघ यांनी शेतकर्‍यांसोबत सामूहिकरीत्या संवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच अडचणी व समस्यांचे निराकरण करून शेतकर्‍यांचे पीकनिहाय समूह तयार करून गटशेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. गटाचे प्रमुख सुनील भिसे यांनी गटाच्या सोयाबीन बीजोत्पादन प्रकल्पाविषयी माहिती दिली. तसेच सोयाबीनच्या पट्टा पद्धत, टोकण पद्धत, सरी वरंबा, गादी वाफा अशा पद्धतीने उत्पादन वाढीतील प्रयोगाविषयी चर्चा करण्यात आली. भारत बोडके यांनी कांदाचाळ उभारणीचा आराखडा आणि खर्चाबाबत अधिकार्‍यांसमोर विविध समस्या मांडल्या. यावेळी सुनील भिसे, रामदास भिसे, किरण बोराडे, मंदा बोडके, रमेश बोडके, गोरख भिसे, अनिल भिसे, सोपान भिसे, भरत बोडके, अरुण भिसे, पांडुरंग भिसे, राधाकिसन भिसे आदींसह प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी महेश विठेकर यांनी आभार मानले.

पीकविमा, महाडीबीटी अंतर्गत विविध योजनांचा लाभ, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड, एकात्मिक फलोत्पादन अभियान, गोपीनाथ मुंढे शेतकरी विमा योजना, कृषी विकास योजनेंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया – योजनांची माहिती देऊन अधिकाधिक शेतकर्‍यांनी योजनांचा लाभ घ्यावा. – अण्णासाहेब गागरे , तालुका कृषी अधिकारी.

हेही वाचा:

Back to top button