Amazon ने भारतीय कर्मचा-यांकडून मागितले राजीनामे, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत | पुढारी

Amazon ने भारतीय कर्मचा-यांकडून मागितले राजीनामे, 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

पुढारी ऑनलाइन डेस्क : Amazon : सध्या अमेरिकेत आर्थिक मंदीचा फटका जाणवत आहे. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. Amazon ला ही याचा सामना करावा लागत असल्याने कंपनीने गेल्या आठवड्यात तब्बल 10 हजार कर्मचा-यांना कामावरून काढून टाकले. त्यानंतर सध्या पुन्हा भारतीय कर्मचा-यांना त्यांनी स्वेच्छेने राजीनामा देण्यास सांगितले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत आर्थिक लाभासह काम सोडण्यास सांगितले आहे. नजीकच्या काळातही आणखी काही कर्मचारी कपात केली जाण्याची शक्यता आहे.

Amazon नुसार, अनुभव आणि तंत्रज्ञान संघातील L1 ते L7 बँडमध्ये काम करणा-या कर्मचा-यांसाठी स्वेच्छा राजीनामा देण्याची योजना आखली आहे. त्या अंतर्गत अनेक भारतीय कर्मचा-यांना तशी सूचना मिळाली आहे. कर्मचा-यांनी व्हीएसपीसाठी साइन अप केल्यास त्यांना या वर्षाच्या 30 नोव्हेंबरपर्यंत स्वाक्षरी करावी लागेल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने असेही स्पष्ट केले आहे की 30 नोव्हेंबर पर्यंत कर्मचा-यांनी स्वेच्छा राजीनामे देऊन व्हीएसपीवर स्वाक्षरी केल्यास त्यांना आर्थिक लाभ मिळतील अन्यथा त्यानंतर त्यांना ते लाभासाठी अपात्र असतील.

कंपनीने कर्मचा-यांना म्हटले आहे की, व्हीएसपीचा फॉर्म कंपनीला भारतीय प्रमाणित वेळेनुसार 30 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 6.30 वाजेपर्यंत मिळणे आवश्यक आहे.

व्हीएसपी वर स्वाक्षरी करणा-या कर्मचा-यांना 22 आठवड्यापर्यंत (जवळपास पाच महिने) बेस पे, तसेच प्रत्येक सहा महिन्यांच्या सेवेसाठी सहा महिन्यापर्यंत सशुल्क विच्छेदनाच्या कमाल लाभापर्यंत एक आठवड्याचे मूळ वेतन मिळेल. त्याचप्रमाणे हे कर्मचारी विम्याचे लाभ मिळवण्यासाठी सुद्धा पात्र आहेत. तर पीआयपी तत्वावरील कर्मचारी व्हीएसपीसाठी पात्र नसतील, असे कंपनीने म्हटले आहे.

हे ही वाचा :

Alzheimer’s disease : नाकात बोट घालण्याच्या सवयीने ‘अल्झायमर’चा धोका

Twitter : हजारो कर्मचारी कपातीनंतर, Twitter 2.0 साठी एलॉन मस्क करणार भारतातील अभियंत्यांची भरती

Amazon कडून पुढील वर्षीही नोकरकपात कायम राहणार, १० हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?

Back to top button