लातूर-नांदेड महामार्गावर डिझेल टँकर उसाच्या ट्रॅक्टरची धडक; आगीचा भडका उडाल्‍याने अनेक वाहने जळाली | पुढारी

लातूर-नांदेड महामार्गावर डिझेल टँकर उसाच्या ट्रॅक्टरची धडक; आगीचा भडका उडाल्‍याने अनेक वाहने जळाली

लातूर, पुढारी वृत्तसेवा : लातूर येथे काही अंतरावर असलेल्या भातखेडा येथील लातूर नांदेड महामार्गावर उसाचा ट्रॅक्टर व डिझेलच्या टँकरची धडक झाली. यामध्ये टॅंकरने पेट घेतला. यात टँकर सह अनेक वाहने जळाली. ही घटना बुधवारी रात्री उशिरा हा भीषण अपघात झाला आहे.

भातखेडा येथे मांजरा नदीच्या नजीक उडान पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर एकाच बाजूने दोन्ही मार्गाची वाहतूक सुरू आहे. बुधवारी रात्री उसाचा एक ट्रॅक्टर व डिझेल टँकरची धडक झाली व त्यात डिझेल टॅंकरने पेट घेतला. हा भडका एवढा मोठा होता की कैक किलोमीटर अंतरावरून त्या आगीचा प्रकाश दिसत होता. विशेष म्हणजे उसानेही पेट घेतल्याने आग अधिक भडकली होती.

दरम्‍यान कापसाचा गाडी असल्‍याने भडका जास्‍त पेटला. यावेळी समोरून जात असलेली एक बस दोन कार व अन्य काही वाहनांनीही पेट घेतला होता. वाहने पेट घेताच त्‍यातील लोकांनी गाडी सोडून तात्‍काळ पळ काढला. त्‍यामूळे मोठी जीवतहानी टळली.

याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन जवान आग विझ वण्यासाठी दाखल झाले. जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु आगीचा भडका प्रचंड असल्‍याने नियंत्रणात आणणे शक्‍य नव्हते. रात्री उशिरा पर्यंत आग फारसी नियंत्रणात आली नव्हती.

 

Back to top button