नाशिक : सुपर 50 परीक्षेचे गुणपत्रक जाहीर

नाशिक : सुपर 50 परीक्षेचे गुणपत्रक जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या सुपर 50 या उपक्रमांतर्गत घेतल्या गेलेल्या प्रवेश परिक्षेकरिता 2,182 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांचे गुणपत्रक हे जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. http://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गुणपत्रक उपलब्ध करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सन 2022-23 मध्ये अनुदानित, अंशत: अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाचे उच्च माध्यमिक विद्यालयातील इ. 11 वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता सीईटी जेईई या व्यावसायिक प्रवेश परीक्षेकरिता जिल्हा परिषदेमार्फत सुपर 50 हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सुपर 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news