पुणे : जिल्हा परिषदेकडून ‘थ्री पॉइंट चॅलेंज’

 पुणे : जिल्हा परिषदेकडून ‘थ्री पॉइंट चॅलेंज’

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेने दहावी आणि बारावीसाठी आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे. शाळांना थ्री पॉइंट चॅलेंज दिले आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थी ही परीक्षा देतील. याद्वारे शाळेचा सरासरी निकाल वाढेल, तसेच पहिल्या दहा विद्यार्थ्यांचे सरासरी गुण दहा टक्क्यांनी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  यापूर्वी जिल्हा परिषदेकडून दहावी-बारावीच्या निकालवाढीसाठी समग्र विकास कार्यक्रम जाहीर केला. या उपक्रमाला जोडूनच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आता प्रत्येक शाळेला थ्रीपॉइंट चॅलेंज दिले आहे.

मात्र, हे करताना विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव टाकू नये, असे निर्देशही प्रसाद यांनी दिले आहे. दहावी-बारावीसाठीच दुसरा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे सर्व विषयांमध्ये सरासरी दहा टक्के वाढ करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. पुढील चार ते पाच महिने या उपक्रमावर काम केले जाईल. हे करताना शाळांमध्ये स्पर्धा तयार करायची नाही. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून शाळा सुधारायच्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक क्षमता तपासून त्यात सुधारणा करायच्या आहेत. यातून एक ताणमुक्त वातावरण तयार करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारायची आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news