नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, २२ आठवड्यांची गर्भवती | पुढारी

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, २२ आठवड्यांची गर्भवती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून एकाने तिच्यावर अत्याचार करीत तिस गर्भवती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. साडे सतरा वर्षीय पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित सर्वेश गोपाळ निकुंभ (२४, रा. दरी मातोरी) याने तिच्यासोबत ओळख करून अत्याचार केला. हा प्रकार एक जून ते पाच नाेव्हेंबर २०२२ या कालावधीत मखमलाबाद गावात झाला.अत्याचारामुळे पीडिता २२ आठवड्यांची गर्भवती झाली आहे. याप्रकरणी पीडितेने म्हसरुळ पोलिस ठाण्यात सर्वेश विरोधात पोक्सोसह अत्याचाराची फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

Back to top button