दिनेश गुप्ता
पुणे : थ्रीईडियट चित्रपटातील रेंचोप्रमाणे वेगळं काही करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या एका संशोधकाने ठरवले तसे करून दाखवले. मुकी जनावरे त्यांचे आजारपण व त्यांना होत असलेला त्रास सांगू शकत नाहीत. याच विषयावर पुण्यातील एका संशोधकाने दोन वर्षांच्या संशोधनानंतर जनावरांच्या आरोग्याची माहिती मोबाईल अॅपवर दाखवणारे डिव्हाइस किट तयार केले. अशा प्रकारचे डिव्हाइस तयार करणारे ते देशातील पहिले संशोधक ठरले आहेत.
पुण्यातील संशोधक श्रीनिवास सुब्रमण्यम यांनी लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून जनावरांच्या देखभालीचे अनोखे डिव्हाइस तयार केले. उच्च शिक्षणाच्या जोरावर त्यांनी बजाज, आदित्य बिर्ला यांसारख्या मोठ्या कंपन्या तर विदेशात थायलंड, इंडोनेशिया, इजिप्त येथे 32 वर्षे नोकरी केली. नोकरी करत असताना काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास त्यांना होता. त्यांच्या डोक्यात एकच विचार यायचा की, मुकी जनावरे त्यांचे दुखणं कसं सांगत असतील?
सायन्स व टेक्नॉलॉजी पार्क, आयआयटी आली पुढे
श्रीनिवास यांनी जनावरांच्या स्वास्थ्यासाठी विकसित केलेले डिव्हाइस शेतकर्यांपर्यंत न्यायचे कसे? याविषयी अनेकांकडून माहिती घेतली. त्याचवेळी त्यांना कोणीतरी सुचवले की, तुम्ही तुमचे संशोधन सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) रोपर यांच्यासमोर सादर करा. त्यानुसार त्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे पुण्याचे संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे यांच्यापुढे संशोधनाचे सादरीकरण केले.
स्टार्टअप योजनेअंतर्गत मुक्या जनावरांसाठी कॉलर व्यवस्था असलेले नेक सेंसर (काऊफीट) काय करू शकते आणि त्याचा फायदा शेतकर्यांना कसा होऊ शकतो, हे त्यांनी पटवून दिले. श्रीनिवास यांच्या मते 90 टक्के अधिक अचूकता देणार्या 100 हून अधिक गुरांवर केटर कॉलरची चाचणी घेण्यात आली आहे. कॉलरमधील सेन्सर व डेटा क्लाऊड सर्वर पाठवतो आणि सानुकूल अल्गोरिदमसह संपूर्ण माहिती मोबाईल अॅपवर पाठवली जाते.
…यामुळे वळले संशोधनाकडे
कोरोनानंतर जनावरांवर पडलेल्या लम्पीसारख्या रोगामुळे शेतकर्यांचे पशुधन हिरावले जात होते, या बाबीचा विचार करून त्यांनी त्यांचा मोर्चा मुक्या जन सुरुवात केली. पशुधनाच्या बाबतीत भारत अव्वल आहे. देशात 30 कोटी पेक्षा जास्त गायी, म्हशी आहेत. या मुक्या जनावरांच्या स्वास्थ्यासाठी मडिजिटल कॅटल हेल्थफ मोहीम राबवली जाऊ शकते. विदेशाच्या तुलनेत कमी किमतीत स्वदेशी डिव्हाइस तयार केल्यास शेतकर्याचे महिन्याकाठी 50 हजार रुपये वाचवले जाऊ शकतात. शिवाय जनावरांचे स्वास्थ्य चांगले राहिल्यास दूध जास्त मिळेल आणि उत्पन्नही. याच विचाराने सुरू केलेल्या संशोधनास मूर्त रूप आले.
काय आहे डिवाइस….
श्रीनिवास यांनी तयार केलेल्या डिवाइसला मब्लूटूथ लो एनर्जीफ या टेक्नॉलॉजीशी जोडले आहे. हे डिवाइस एका पट्ट्यामध्ये बसवण्यात आले असून ते जनावरांच्या गळ्यात बांधले जाते. ही जनावरे 50 ते 100 मीटरच्या परिसरात असली तरी त्यांच्या सर्व हालचाली, त्यांच्या खाण्याची व रवंथ करण्याची पद्धत, त्यांच्या बसण्याची पद्धत तसेच त्यांचे टेंपरेचर डिव्हाइस कॅप्चर करून ते मोबाईल अॅपवर पाठवते.
शेतकर्यांना काय माहिती मिळते?
जनावराच्या गळ्यात बांधलेल्या पट्ट्यामध्ये डिव्हाइस असून त्यात 'सिम' आहे. त्याआधारे जनावराच्या आरोग्याबाबतची विश्लेषणात्मक माहिती मोबाईल अॅपवर येते. जनावराचे तापमान, त्याचे चरणे व रवंथ किती, ते किती वेळ उभे किती वेळ बसले, दैनंदिन हालचाली कशा आहेत? 'हिट'वरमध्ये म्हणजेच माजावर आली की नाही याची संपूर्ण माहिती मिळते.
श्रीनिवास यांनी सादर केलेल्या संशोधनावर आम्ही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले. हे संशोधन शेतकरी व मुक्या जनावरांसाठी वरदान ठरणार आहे. स्टार्टअप योजनेअंतर्गत आम्ही त्यांना सहकार्य केले आहे. भारतीय तंत्रज्ञानाचे हे पहिले संशोधन असून शेतकर्यांच्या फायद्याचे आहे.
– डॉ. राजेंद्र जगदाळे, संचालक,
सायन्स व टेक्नॉलॉजी पार्क, पुणे.देश-विदेशात मोठ्या पदावर नोकरी केल्यानंतरही काही वेगळे करण्याची माझी इच्छा होती. या कामात कुटुंबाने साथ दिली म्हणूनच मी शेतकर्यांना वरदान ठरणारे डिव्हाइस विकसित करू शकलो. माझ्या इनोव्हेशनचा नुकताच राज्य सरकारने गौरव केला आहे. खासगी डेअरीत असलेल्या गायीवर प्रयोग यशस्वी झाले असून,देशपातळीवर लवकरच जात आहोत.
– श्रीनिवास सुब्रमण्यम, संशोधक