नाशिक : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींचा वाजला बिगुल | पुढारी

नाशिक : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींचा वाजला बिगुल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील १९६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या २७ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. नुकत्याच जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी संपताच पुन्हा निवडणूक फीव्हर बघायला मिळणार आहे.

राज्यातील ३४० तालुक्यांमधील मुदत संपलेल्या आणि संपणाऱ्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १९६ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३४० तालुक्यांमधील मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित व समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या अशा सुमारे सात हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी पार पडल्यानंतर आता पुन्हा सर्वांत मोठ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील तब्बल सात हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला असून, नाशिक जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.

जिल्ह्यातील या ग्रामपंचायतींचा समावेश…

यामध्ये इगतपुरी ०२, कळवण १६, चांदवड ३५, त्र्यंबक ०१, दिंडोरी ६, देवळा १३, नांदगाव १५, नाशिक १४, निफाड २०, पेठ ०१, बागलाण ४१, मालेगाव १३, येवला ०७, सिन्नर १२ अशा १९६ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

निवडणूक कार्यक्रम असा…

अर्ज सादरीकरण : २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर

माघार : ७ डिसेंबर

मतदान : १८ डिसेंबर

मतमोजणी : २० डिसेंबर

हेही वाचा :

Back to top button