'महालढाई' अंतिम टप्प्यात | पुढारी

'महालढाई' अंतिम टप्प्यात

प्रासंगिक- ‘महालढाई’ अंतिम टप्प्यात

भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना संसगांचा प्रभाव कमी “होत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढचात मंगळवार, ८ नोव्हेंबर हा दिवस महत्त्वाचा ठरला. कारण, या दिवशी देशात कोरोनाचे ६२५ नवीन रुग्ण आढळून आले आणि ९ एप्रिल २०२० नंतरचा हा सर्वात नीचांकी आकडा आहे. तसेच या दिवशी देशात कोरोनामुळे एकाही डोस उपलब्ध आहेत. रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

संपूर्ण जगासह भारतातून आता कोरोनाचे सावट दूर होत आहे. हा संसर्ग आरोग्याच्या दृष्टीने आजही आव्हानात्मक आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात जगाला काही सूचना दिल्या आहेत. कोरोना रुग्णांत घट झाली असली तरी देशांना सजगता बाळगावी लागेल आणि लसीकरण मोहीम सुरू ठेवावी लागेल, असे म्हटले आहे.

तीन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या थैमानाने हतबल झाले आहे. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन, क्वारंटाईन या शब्दांनी नागरिकांची झोप उडाली. असला तरी निष्काळजीपणा हा पुन्हा कोरोनाला निमंत्रण देऊ शकतो. आतापर्यंत या संसर्गामुळे जगात ६६ लाख जणांचा मृत्यू झाला असून, एकूण बाधितांची संख्या ६३ कोटी राहिली आहे. भारतात. देखील एकूण बाधितांची संख्या ४.४६ कोटी राहिली, तरं मृतांचा आकडा ५.२९ लाख राहिला; परंतु आजघडीला भारतात नवीन रुग्णांची संख्या फारशी नाही. मृतांची संख्यादेखील असून नसल्यासारखी आहे. एकंदरीतच आपल्या देशाने कोरोनावर चांगले नियंत्रण मिळवल्याचे दिसून येते; पण जोपर्यंत हा संसर्ग शून्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण ही लढाई जिंकली असे म्हणता येणार नाही.

देशात काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाचे पाच नवीन व्हेरियंट आढळून आले. त्यांच्यामुळे होणारा संसर्ग अपेक्षेपेक्षा खूपच कमी धोकादायक आहे. मात्र, गंभीर आजारपण असलेल्या लोकांना हा संसर्ग जीवघेणा ठरू शकतो, याकडे वैद्यकीय यंत्रणांचे लक्ष आहे. मुळातच कोव्हिडविरोधातील लढाई भारताने अत्यंत हिकमतीने लढली. भारताने केलेल्या यशस्वी लसीकरण मोहिमेतून जगासमोर आदर्श उभा केला आहे. जगातील या सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत २१९.३२ कोटी डोस दिले आहेत. देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येला ९२ टक्क्यांपर्यंत दोन्ही डोस, तर ९८ टक्क्यांपर्यंत कमीत कमी एक डोस दिला गेला आहे. बूस्टर डोस आणि लहान मुलांचे लसीकरण सुरू आहे. तथापि, बूस्टर डोस घेण्याची प्रक्रिया खूपच संथ आहे. तरुण मुलांचा लस घेण्याचा दरही फारसा उत्साहवर्धक नाही, लसीचा डोस नव्याने खरेदी केली जाणार नाही अशी घोषणा केली. लस निर्मात्या कंपन्यांनीदेखील उत्पादन थांबविण्यासाठी आणि उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे अजूनही १.८ कोटीपेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारचे डोस उपलब्ध आहेत.

तज्ज्ञांच्या मते, नागरिकांनी लस घेण्यात कोणताही हलगर्जीपणा दाखवू नये. विशेषतः जे आजारी आहेत, त्यांनी कोरोनाळ कोणत्याही प्रकारची जोखीम उचलू नये आणि तो वलल्यास जीवघेणी ठरू शकते, असा इशाराही दिला आहे. वयस्कर आणि गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या लोकांनी बस्टर डोस वेळेत घेणे अपेक्षित आहे. भविष्यातील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी लागणार आहे; परंतु आजघडीला लोक, शासकीय यंत्रणा इतकेच नव्हे तर लसनिमतिही कोरोनाला अक्षरशः कंटाळले आहेत.

सध्या कोरोनाचा धोका असून नसल्यासारखा असला तरी निष्काळजीपणा हा पुन्हा कोरोनाला निमंत्रण देऊ शकतो. कोरोनाने शिकवलेले धडे लक्षात ठेवावे लागतील. कोरोनाने आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणला आहे आणि त्याचा अंगीकार करायला हवा. आपल्याकडे जगण्याची शिस्त नव्हती, म्हणूनच कोरोनाचे संकट बिकट बनत गेले, हे विसरून चालणार नाही. कोरोनामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. त्यातून अनेक कुटुंबे सावरली, तर अनेकांना कोरोनाचा फटका बसला. आर्थिक नुकसानीबरोबरच अनेकांचे मानसिक संतुलनही ढासळले. विशेषतः छोटा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली, अनेकांनी आत्महत्या केल्याचे समोर आले, तर काहींना केवळ कोरोनाचा धसका घेतल्याने आपले प्राण गमवावे लागले. गरिबांचे तर संसारच उघड्यावर पडले. यातून सर्वांनी बोध घेतल्याने कोरोनापासून सावरण्याची संधी मिळाली. आता कोरोना महामारी संपुष्टात आल्याने जगभरात चांगले वातावरण आहे. मात्र, आता कोरोनामुळे मिळालेल्या धड्यातून भविष्यात आणखी कोणत्या आजाराचा फैलाव झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. अखिल • मानवजातीला भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी कोरोनातून मिळालेल्या अनुभवाचा नक्कीच फायदा होईल आणि त्यातून सामाजिक वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होईल हे निश्चित !

– विनायक सरदेसाई

Back to top button