देवदिवाळी,www.pudhari.news
देवदिवाळी,www.pudhari.news

नाशिक : कपालेश्वर मंदिरात देवदिवाळी महोत्सवाचा समारोप

 नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
दरवर्षीप्रमाणे देवदिवाळीनिमित्त श्री कपालेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या देवदिवाळी महोत्सवाचा विविध धार्मिक कार्यक्रमांनी सोमवारी (दि.7) समारोप करण्यात आला.

सोहळ्याला शनिवारी (दि. 5) प्रारंभ झाला होता. यात भगवान विष्णू व महादेवाचे पूजन, नवग्रह स्थापना व पूजन करण्यात येऊन महाविष्णू यागाला सुरुवात झाला. रविवारी (दि. 6) हरिहर भेट सोहळा तर सोमवारी (दि. 7) अर्धनारी नटेश्वराच्या शृंगाराने समारोप करण्यात आला. यात तीनही दिवस मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आली होती.

देव दिवाळी महोत्सव गेली दोन वर्षे कोरोना काळातील निर्बंधांमुळे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. मात्र शासनाने सर्व निर्बंध हटवल्यामुळे कपालेश्वर मंदिरात यंदा मोठ्या उत्साहात देव दिवाळी महोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महाविष्णू याग करून पूर्णाहुती, चातुर्मास समाप्तीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कपालेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीवर दररोज वेगवेगळी आकर्षक सजावट करून देवाला साजशृंगार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांचे पौरोहित्य अमोल साकोरकर, प्रसाद साकोरकर, अजिंक्य प्रभू , सौरभ गायधनी, श्रीराम नाचण, रोहित सुंठवाल, राहुल बेळे व सहकार्‍यांनी केले.

पिंडीला 3 दिवस आकर्षक शृंगार
देवदिवाळी महोत्सवाच्या निमित्ताने शनिवारी
(दि. 5) महादेव रूपात, रविवारी (दि. 6) हरिहर रूपात सोमवारी (दि 7) अर्धनारीनटेश्वर रूपात पिंडीला शृंगार करण्यात आला होता. दरवर्षी महोत्सवाचा समारोप आणखी एक दिवसाने होतो. मात्र यंदा मंगळवारी (दि. 8) चंद्रग्रहण असल्याने एक दिवस आधी महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news