ना. डॉ भारती पवार : नाशिक-कळवण रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी | पुढारी

ना. डॉ भारती पवार : नाशिक-कळवण रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक – दिंडोरी – वणी – कळवण या राज्य महामार्गाची अत्यंत्य दुरावस्था झाली आहे. यापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलनेही छेडण्यात आली. मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. येथील रस्त्याच्या अनेक तक्रारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्याकडे आल्याने अखेर त्यांनी अधिका-यांना सोबत घेत रस्त्याची पहाणी केली. तयेख अधिका-यांना तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.

यापुढे रस्त्यामुळे नागरीकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना डॉ. पवार यांनी अधिका-यांना दिल्या. नाशिक ते कळवण रस्त्यावर आरोग्य विज्ञान विद्यापीठ ते वणी रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांनी या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ना. पवार यांनी नागरिकांच्या सूचनेची दखल घेत अधिकारी वर्गासह अकराळे फाटा ते दिंडोरी शहर परिसरात जात वारंवार अपघात घडणारे ठिकाणे व रस्त्याची ज्या ठिकाणी दुरावस्था झाली आहे. त्या ठिकाणी पाहणी केली.

हेही वाचा:

Back to top button