सातारा: चिंचणी येथे दुचाकी-कारच्या अपघातात दोन जण ठार | पुढारी

सातारा: चिंचणी येथे दुचाकी-कारच्या अपघातात दोन जण ठार

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा : सातारा-मेढा रस्त्यावर चिंचणी (ता. सातारा) येथे चारचाकी व दुचाकीच्या अपघातात मेढा येथील २ जण ठार झाले. तर चारचाकीमधील लहान मुलासह ५ जण जखमी झाले. आज (दि.२८) झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. भरत यदु शेलार (वय 48, रा. थोरली काळोशी) व रघुनाथ दत्तात्रय चिकणे (वय 54, रा. मेढा) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी गाडी मेढ्याहून सातारकडे येत होती. यावेळी चिंचणीनजीक गाडीचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास उडवले. त्यानंतर दोन्ही वाहने नाल्यामध्ये कोसळली. यात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी होऊन ठार झाले. तर चारचाकीमधील एक १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. तर इतर ५ जण किरकोळ जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच चिंचणीसह परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी केली होती. घटनास्थळी सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या समवेत पोलीस कर्मचारी दाखल झाले. या अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महेंद्र पाटोळे करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button