नाशिक : फटाके फोडण्याच्या वादातून टोळक्याकडून दोघांना मारहाण | पुढारी

नाशिक : फटाके फोडण्याच्या वादातून टोळक्याकडून दोघांना मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक शहरात गुन्हेगारी फोफावत चालली असून पोलीस हातावर हात बांधून असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच ‘फटाके फोडा पण घरावर टाकू नका’ असे सांगितल्यावरून टोळक्याने युवकास जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत युवकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नाशिकच्या फुलेनगर परिसरात ही घटना घडली असून संविधान मधुकर गायकवाड असे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे़. हा प्रकार फुलेनगरमधील गजानन चौकात रात्री साडेदहा वाजता घडला. याबाबत पंचवटी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा फुलेनगर परिसरात राहतो. 24 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा दिवस असल्याने सर्वत्र फटाक्यांची आतिषबाजी सुरू अशातच परिसरात राहणारे काही युवक फटाके फोडत होते. हे युवक फटाके फोडून ते तक्रारदाराच्या घरावर टाकत होते. यावरून तक्रारदाराने संबंधित युवकांच्या घरी जाऊन समज दिली की, मुलं घरावर फटाके फोडून टाकत आहेत. यावरून संबंधित युवकांनी मित्र जमवून तक्रारदाराच्या घरासमोरच मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यावेळी युवकांनी तक्रारदारास लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच काहींनी घरावरील कौलांनी तक्रारदाराच्या डोक्याला मारहाण केली. दरम्यान या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सध्या जखमी युवकावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :

Back to top button