WhatsApp कशामुळे बंद पडले?, मेटाने सरकारला सादर केला रिपोर्ट | पुढारी

WhatsApp कशामुळे बंद पडले?, मेटाने सरकारला सादर केला रिपोर्ट

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : WhatsApp हे इन्स्टंट कम्युनिकेशन ॲप आहे. पण गेल्या मंगळवारी व्हॉट्सॲप तब्बल दोन तास बंद पडले होते. या पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या नोडल सायबर सुरक्षा एजन्सी (ICERT) कडे अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार मेटाने व्हॉट्सअॅपच्या आउटेजचा अहवाल सादर केला आहे. सरकारी सूत्रांचा हवाला देत पीटीआयच्या वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की व्हॉट्सअॅप आउटेजचा अहवाल मेटाने आधीच सादर केला आहे.

आयटी मंत्रालयाने मंगळवारी झालेल्या ब्लॅकआऊटमागील कारणे विचारली होती. आउटेजनंतर व्हॉट्सअॅप आणि मेटा यांनी एक निवेदन जारी केले.. त्यात त्यांनी म्हटले होते की आउटेज तांत्रिक त्रुटीमुळे झाले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “तांत्रिक त्रुटीमुळे काही कालावधीसाठी व्हॉटस्अॅप बंद पडले होते आणि या समस्येचे लगेच निराकरण करण्यात आले आहे.”

WhatsApp चे मंगळवारी झालेले आउटेज आतापर्यंतचे सर्वात मोठे होते. यामुळे तब्बल दोन तास व्हॉटसॲपची सेवा बंद होती. यूजर्संना मेसेज पाठवता येत नव्हते. तसेच मेसेज येणे बंद झाले होते. व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्स आणि व्हॉईस कॉल्सही बंद झाले होते. आउटेजमुळे झालेल्या नुकसानीबद्दल सरकार किंवा व्हॉट्सअॅपकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

आउटेज डिटेक्शन वेबसाइट DownDetector याची पुष्टी करत म्हटले होते की WhatsApp डाउनचा लाखो यूजर्संना फटका बसला. मुंबई, दिल्ली, कोलकाता, लखनौसह भारतातील अनेक भागांत व्हॉट्सॲप सेवा खंडित झाली. डाउनडिटेक्टर लाइव्ह आउटेज नकाशावर दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळूर आणि लखनौ यासह बहुतांश मोठ्या शहरातील व्हॉटसॲप सेवा बंद पडल्याचे दिसून आले होते.

हे ही वाचा :

Back to top button