टी-20 विश्वचषकानिमित्त देशभरात चिअरिंग स्क्वॉडतर्फे यज्ञ | पुढारी

टी-20 विश्वचषकानिमित्त देशभरात चिअरिंग स्क्वॉडतर्फे यज्ञ

त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
चिअरिंग स्क्वॉड इंडिया फाउंडेशनतर्फे टी 20 वर्ल्ड कप कॅम्पेनच्या औचित्याने विजयी भव महायज्ञ करण्यात आला. सामन्याच्या दिवशी देशभर 101 यज्ञांचे आयोजन करण्यात आलेले आहे. www.cheerforindia.org या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह यज्ञाचे स्ट्रीमिंग करण्यात येते.

यमाय ओमनमो’ या आध्यात्मिक स्टार्टअपशी संबंधित असलेल्या चिअरिंग स्क्वॅड इंडिया फाउंडेशन या मुंबईतील संस्थेतर्फे या क्रिकेट हंगामात आध्यात्मिक कॅम्पेन सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत महायज्ञ करण्यात येणार असून, या माध्यमातून टीम इंडियासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक समजल्या जाणार्‍या नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये महायज्ञ करत या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला.
वर्ल्ड कपमधील सामन्यांच्या दिवशी चेन्नई, तिरुपती, श्रीपेरंबदूर, पुणे, वेल्लोर, सिंधुदुर्ग, हैदराबाद, औरंगाबाद अशा एकूण 101 ठिकाणी महायज्ञ आयोजित करण्यात आल्याची माहिती माय ओमनमो आणि चिअरिंग स्क्वॅड इंडिया फाउंडेशनचे (सीआयएसएफ) संस्थापक मकरंद पाटील यांनी दिली.

या कॅम्पेनच्या माध्यमातून संकलित होणार्‍या निधीचा मोठा हिस्सा अनेक सामाजिक संस्थांना दान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button