नांदेड: दिवाळी सणात चोरांचा धुमाकूळ; लोहा येथे ६ लाखांचे दागिने लंपास | पुढारी

नांदेड: दिवाळी सणात चोरांचा धुमाकूळ; लोहा येथे ६ लाखांचे दागिने लंपास

लोहा (नांदेड), पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्‍हातील लोहा शिवकल्याण नगरातील घरात कुणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी ६ लाख १५ हजार रुपये किंमतीचे दागिने पळविले. ही घटना शनिवारी (दि. २२) रोजी भरदिवसा ३ वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, लोहा शहरातील उचभ्रू वस्ती शिवकल्याण नगर भागातील जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त अभियंता असलेले वसंत कळसकर हे शनिवारी सकाळी दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी सहकुटुंब घराला कुलूप लावून नांदेडला गेले होते. दुपारच्या वेळी कळसकर यांच्या घरी कूणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर ६ लाख १५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

कळसकर यांच्या घराचा दरवाजा उघडाच असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. यावेळी चोरीचा संशय आल्याने शेजाऱ्यांनी कळसकर यांना याबाबत माहिती दिली. यानंतर त्यांनी तात्काळ लोहा पोलिसांना घटनेची माहिती दिली. लोहा पोलीस ठाण्याचे कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली. वसंत कळसकर यांनी लोहा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

बीड: बसवर दगड मारून मद्यधुंद व्यक्तीची चालकाला जीवे मारण्याची धमकी 

धक्कादायक! व्हॉट्सॲप ‘या’ फोनमध्ये होणार बंद 

बेळगाव : विधानसभेचे उपसभापती आनंद मामणी अनंतात विलीन

Back to top button