रोजगार मेळावा : केंद्र सरकारच्या मेळ्यात रेल्वेत 101 तरुणांना मिळाली नोकरी | पुढारी

रोजगार मेळावा : केंद्र सरकारच्या मेळ्यात रेल्वेत 101 तरुणांना मिळाली नोकरी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

दीपावलीच्या मुहूर्तावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “रोजगार मेळाव्या” अंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये हजारो नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. शनिवारी, दि. 22 रोजी या “रोजगार मेळाव्या” अंतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या कृष्णचंद्र हॉलमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुल्हारी यांच्याकडून आरआरबी आणि अनुकंपा तत्त्वावर निवडलेल्या 101 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

रेल्वेत नोकरीचे नियुक्तीपत्र मिळाल्याने निवड झालेल्या सर्व उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रेल्वेतील सर्व उमेदवारांनी आभार व्यक्त करून ते म्हणाले की, रेल्वेतील भरती प्रक्रिया वेळेवर आणि पारदर्शक आहे. या कार्यक्रमात अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासकीय), रुकमय्या मीना, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.शिवराज मानसपुरे, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी भुसावळ, एन.एस.काजी, सहाय्यक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके, गोविंदकुमार सिंग उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.वडनेरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कल्याण निरीक्षक व भरती विभागाने सहकार्य केले.

तरुणांनी मानले पंतप्रधानांचे आभार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केले. भुसावळ रेल्वे विभाग मधू 101 युवक व महिला रोजगार नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले आहे. भुसावळ मंडल चे मुख्य व्यवस्थापक यांनी रोजगार मिळाला त्याना शपथ देण्यात आली. ज्या युवकांना रोजगार मिळाला त्‍यानी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

हेही वाचा:

Back to top button