नाशिक : कारची धडक बसल्याने पादचारी ठार | पुढारी

नाशिक : कारची धडक बसल्याने पादचारी ठार

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

कारची धडक बसल्याने पादचारी ठार झाल्याची घटना आडगाव शिवारातील दत्त मंदिराजवळ घडली. या अपघातात सुनील हिरामण पुराणे (३८, रा. आडगाव शिवार) यांचा मृत्यू झाला. अनिल हिरामण पुराणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा भाऊ सुनील पुराणे हे शनिवारी (दि. १) सकाळी 8 च्या सुमारास आडगाव शिवारात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी एमएच १५, डीएम ९६६७ क्रमांकाच्या कारने धडक दिल्याने सुनील यांना गंभीर मार लागला व त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर कारचालक फरार झाला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button