Nashik : आसाराम बापू आश्रमाच्या संचालकाचे अपहरण | पुढारी

Nashik : आसाराम बापू आश्रमाच्या संचालकाचे अपहरण

पंचवटी, पुढारी वृत्तसेवा : नाशिकमधील (Nashik) संत आसाराम बापू आश्रमाच्या संचालकाचे चौघा अनोळखी इसमांनी अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि.२) दुपारी पंचवटी परिसरात घडली. संजीव किशनकिशोर वैद (वय-४४) असे या संचालकांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंगापूर रोडवरील सावरकर नगर येथील संत आसाराम बापू आश्रमाचे संचालक संजीव किशनकिशोर वैद वय हे नाशिक आश्रमातील (Nashik) गायींना खाद्य खरेदी करण्याकरीता महिन्द्रा पिकअप (क्र. एम एच ४८ टी ३०९६) हे वाहन घेऊन गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास पंचवटीत आले होते.

ते सेवाकुंज येथील नागसेठीया पशू खाद्य दुकानात आले असता त्यांना ४ अनोळखी इसमांनी त्यांच्या राखाडी रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा या कारमध्ये बळजबरीने घेऊन गेले, अशी फिर्याद राजेश चंद्रकुमार डावर (४२, रा. संत श्री आसारामजी बापू आश्रम, सावरकर नगर, गंगापूर रोड नाशिक) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आर. एम. केदार हे पुढील तपास करीत आहेत.

पहा व्हिडीओ : मुलगी क्रिकेट खेळणार म्हणून चिडवले : पण उंचावले तिने नाव कोल्हापूरचे

Back to top button