नाशिक : रेल्वेसमोर झोकून देत महिलेची आत्महत्या | पुढारी

नाशिक : रेल्वेसमोर झोकून देत महिलेची आत्महत्या

नाशिक : लाखलगाव येथे धावत्या रेल्वेसमोर एका महिलेने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. महिलेची ओळख पटलेली नसून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि.२३) मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील महिलेने रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. याप्रकरणी आडगाव पोलिस महिलेची ओळख पटवत आहेत.

हेही वाचा

Back to top button