Dhule : भरपावसात पोलीस ठाण्याबाहेर मृतदेह ठेऊन नातेवाईकांचा ठिय्या | पुढारी

Dhule : भरपावसात पोलीस ठाण्याबाहेर मृतदेह ठेऊन नातेवाईकांचा ठिय्या

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा
शेतीच्या बांधावरुन झालेल्या वादात डोक्यात फावड्याचा दांड्याचा जबर मार लागून मृत पावलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी भर पावसात साक्री पोलीस ठाण्याबाहेर ठेवला. जोपर्यंत मारेकऱ्यांना पोलीस अटक करत नाही आणि त्यांच्यावर ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्याबाहेरून उचलणार नाही अशी भूमिका मृत शेतकऱ्याच्या संतप्त नातेवाईकांनी घेतली.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या नाडसे गावात शेतातील रस्त्याच्या वादात शेतकरी देविदास चैत्राम नेरकर यांच्या डोक्यात संशयताने फावड्याच्या दांड्याने जोरदार मार केल्याने जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु गेल्या आठ दिवसांपासून उपचार घेत असताना उपचारादरम्यान आज अखेर जखमी शेतकऱ्याचा मृत्यू झाला. संबंधितांवर पोलिसांनी कृपादृष्टी दाखविल्याने ते अद्यापही फरार असल्याचा आरोप देखील संतप्त नातेवाइकांनी यावेळी केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे, सपोनी. जयकुमार चव्हाण, सपोनी. हनुमंत गायकवाड, पोउनी. रोशन निकम यांनी मध्यस्थी करत आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी नेला.

हेही वाचा :

Back to top button