नाशिक : थकीत कर वाहनांचा 7 जूनला ई-लिलाव | पुढारी

नाशिक : थकीत कर वाहनांचा 7 जूनला ई-लिलाव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांत जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ई-लिलाव दि. 7 जून रोजी सकाळी 11 ला करण्यात येणार आहे. या अनुषंगाने थकीत कर असलेल्या वाहनमालकांना दि. 6 जूनपर्यंत वाहन कर व पर्यावरण कर भरण्याची संधी देण्यात येत आहे, अशी माहिती कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली आहे.

जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी दि. 31 मे ते 5 जून या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे 62 हजार 200 रुपये रकमेचा आरटीओ नाशिक या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सह नाव नोंदणी करून प्रत्यक्ष उपस्थित राहून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. ई-लिलावाची प्रक्रिया कोणतेही कारण न देता, तहकूब करण्याचा अधिकार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कर वसुली अधिकारी यांना देण्यात आला आहे. हा जाहीर ई-लिलाव 7 जूनलाwww.eauction.gov.in या संकेतस्थळावर सकाळी 11 ते 4 या कालावधीत होणार आहे. सविस्तर माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाहने जशी आहेत, तशी या तत्त्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहेत, असेही शिंदे यांनी कळविले आहे.

हेही वाचा:

Back to top button