Unique wedding : नवरी मिळे नवर्‍याला; चार फुटी वधू-वराच्या अनोख्या लग्नाची गोष्ट

Unique wedding : नवरी मिळे नवर्‍याला; चार फुटी वधू-वराच्या अनोख्या लग्नाची गोष्ट
Published on
Updated on

मालेगाव,देवळा : पुढारी वृत्तसेवा : सद्या लग्नसोहळ्यांचा धूमधडाका सुरु आहे. स्थळ शोधमोहीम एक दिव्य ठरतेय. त्यात आर्थिक – सामाजिक पतच नव्हे, तर रंग, रुप आणि उंचीला विशेष महत्व दिले जाते. एखाद्या पातळीवर तोलमोलात कमी पडले तरी माशी शिंकते. त्यातही उंची कमी असली की मग उपवर-वधूची परीक्षा लागते. असाच एक विवाह (Unique wedding) मालेगावातील संगमेश्‍वरमध्ये पार पडला, ज्याची एकच चर्चा सुरू आहे.

(Unique wedding) कोरोना साथीमुळे दोन वर्ष बंधनात असलेले सोहळे यंदा धुमधडाक्यात होत आहेत. आप्त, परिचितांना विवाहांना हजेरी लावताना दमछाक होतेय. त्यावरुन एकसुरी चर्चा सर्वत्र एकायला मिळत असताना संगमेश्‍वरातील एका लग्नाची गोष्ट चांगलीच व्हायरल होत आहे. महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक पगारे यांचा मुलगा राहुल हा वयात आला. तशी घरच्यांकडून वधू शोध मोहीम सुरु झाली. मात्र, त्यात उंची आडवी आली. राहुल याची उंची चार फूट सहा इंच. लग्न करताना अनेक बारकावे पाहिले जातात.

नोकरी, धंदा, शेती, घरदार, रंग आणि उंची. सर्वकाही योग्य असले तरी सोयरीक जुळेलच याचीही काही शाश्‍वती नसते. तेव्हा आहेर कुटुंबापुढे मोठे आव्हान होते. त्यांची चांगलीच दमछाक झाली. पण म्हणतात ना, 'रब ने बना दी जोडी'. तसाच काहीसा प्रत्यय आला. लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात, तशी राहुलला वंदना लाभली. जशी अवस्था आहेर कुटुंबाची तसाच अनुभव गारेगावमधील जगताप कुटुंब घेत होते. योग्य वर आणि वधू एवढा एकच समानधागा दोघांचा राहिला. कै. प्रभाकर मोतीराम जगताप यांची कन्या वंदना हिची उंचीही चार फूट. दोन्ही विश्‍वकर्मा समाजाचे असल्याने आप्त-नातेवाईकांच्या माध्यमातून या दोन्ही कुटुंबाची सोयरिक जुळली. वंदनाचे (वय २०) बारावीपर्यंतचे शिक्षण झालेले तर राहुल (वय ३०) हा खासगी दुकानात नोकरीला. पसंती होऊन बुधवारी (दि.२५) त्यांचा थाटामाटात विवाह संपन्न झाला. या देखण्या सोहळ्याची एकच चर्चा होत आहे.

Unique wedding : सेल्फी विथ…

या नवदाम्पत्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. वर्‍हाडींचा उत्साह दांडगा होता. नवरदेव-नवरीची रथातून मिरवणूक काढण्यात आली. अक्षता पडल्या आणि एकच झुंबड उडाली. एरव्ही इतर लग्नात स्टेजवरुन खाणाखुणा झाल्या की फोटोसेशनसाठी एक-एक गट पुढे होता. मान्यवरांचे छायाचित्रण झाले की मग. पण या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या जोडप्याबरोबर फक्त फोटो नव्हे, तर सेल्फी घेण्याचा मोह कुणालाच आवरला नाही. जवळच्या आणि मानपानाच्या मान्यवरांनी तर दोघांना कडेवर घेत फोटो घेत 'नांदा सौख्य भरे'च्या शुभेच्छा दिल्या. या लांबलेल्या कार्यक्रमाने अनेकांना ताटकळत उभे राहावे लागले, हे वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाही.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news