नाशिक : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

नाशिक www.pudhari.news
नाशिक www.pudhari.news

नाशिक : शहरातील जेलरोड परिसरातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. या प्रकरणी उपनगर व नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या घटनेत जेलरोडवरील लोखंडे मळा परिसरातील अल्पवयीन मुलगी रविवारी (दि. 1) सकाळच्या सुमारास बेपत्ता झाली. पाणी भरत असताना ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. या आधीदेखील दोनदा ही मुलगी बेपत्ता झाली होती, मात्र ती घरी परतली होती. या प्रकरणी उपनगर पोलिस तपास करीत आहेत. तर दुसर्‍या घटनेत जेलरोड येथील राजराजेश्वरी चौक परिसरातून अल्पवयीन मुलगी रविवारी (दि.1) दुपारी बेपत्ता झाली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news