नाशिक : शांतता भंग होईल, असे कृत्य करु नका ; भोंग्याप्रकरणी पोलिस आयुक्तांचा इशारा | पुढारी

नाशिक : शांतता भंग होईल, असे कृत्य करु नका ; भोंग्याप्रकरणी पोलिस आयुक्तांचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भद्रकाली परिसरातील मंदिरात भोंगे लावून मनसेने हनुमान चालीसा लावली. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहरात विनापरवानगी साउंड सिस्टिम, डीजे न लावण्याचे आदेश दिले असल्याचे स्पष्ट केले. त्याचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी आहे. भोंग्यांवरून कायद्याचे उल्लंघन होऊन शांतता भंग होईल, असे कृत्य न करण्याचे आवाहन पाण्डेय यांनी केले आहे.

मंगळवारी देखील याच ठिकाणी हनुमान चालीसा लावण्यात आली. त्यानंतर आयुक्त पाण्डेय यांनी शहरात शांतता भंग होईल असे कृत्य न करण्याचे आवाहन केल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button