नाशिक : आमदारांना घरे, मग आम्हाला का नाहीत’, भुजबळांच्या गाडीला घेराव | पुढारी

नाशिक : आमदारांना घरे, मग आम्हाला का नाहीत’, भुजबळांच्या गाडीला घेराव

नाशिक लासलगाव पुढारी वृत्तसेवा : ‘आमदारांना घरे, मग आम्हाला का नाहीत’, असे म्हणत लासलगाव येथील संजयनगर झोपडपट्टी वसाहतीतील नागरिकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे वाहन अडवत घेराव घातला.

यामुळे काहीवेळ पालकमंत्र्यांचा ताफा खोळंबला होता. गेल्या आठवड्यात अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना घरे बांधून देणार असल्याचे जाहीर केले होते. यावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबत विचार पुढे आला आहे. मात्र, यातून राज्य सरकारच्या मंत्र्यांना जनतेचा रोष पत्कारावा लागत आहे. यातच मंगळवारी (दि.29) लासलगाव येथे दौर्‍यावर आलेले पालकमंत्री भुजबळ येथील शिलाई मशीन वाटप व रस्ता सुधारणा कामाचे उद्घाटन करून नाशिककडे जाण्यासाठी निघाले असता लासलगाव येथील संजयनगरमधील नागरिकांनी त्यांचे वाहन अडवत गाडीला घेराव घातला. यावेळी आम्ही तुम्हाला भरघोस मतांनी निवडून दिले. मग आमदारांना घरे देत आहात तर आम्हाला का नाही, असा सवाल यावेळी येथील महिलांनी केला.

हेही वाचा :

Back to top button