चारित्र्याचा संशय ; जळगावी पतीकडून पत्नीची दगडाने ठेचून हत्या

चारित्र्याचा संशय ; जळगावी पतीकडून पत्नीची दगडाने ठेचून हत्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दगडाने ठेचून निघृणपणे पत्नीची हत्या केल्याची थरारक घटना चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्ग्या परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा येथे औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील प्रकाश उर्फ भुरा सोनवणे हे पत्नीच्या पोटात दुखत असल्याने आलेले होते. चारित्र्यावर संशय घेऊन भूरा सोनवणे यांनी दगडाने ठेचून पत्नीची निघृणपणे हत्या केली. मायाबाई प्रकाश उर्फ भुरा सोनवणे (वय- ४०) असे मृत झालेल्या विवाहितेचा नाव आहे.

ही धक्कादायक घटना २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी प्रकाश उर्फ भुरा सोनवणे याला ताब्यात घेतले आहे. गं. भा. भारतीबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम-३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानूसार पुढील तपास सपोनि दिपक बिरारी हे करीत आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news