जळगाव : चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला चोपण्याचा प्रयत्न, महिला आघाडीचा संताप | पुढारी

जळगाव : चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला चोपण्याचा प्रयत्न, महिला आघाडीचा संताप

जळगाव पुढारी वृत्तसेवा : धरणगावातील सहा वर्षीय चिमुकलीवर एका ६२ वर्षीय वृध्दाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीला जळगाव न्यायालयात हजर केले असता शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्याला काळे फासून चोप देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीसांच्या सतर्कतेने महिलांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

धरणगाव शहरातील एका भागात राहणारी सहा वर्षीय चिमुकलीवर एका ६२ वर्षीय वृध्दाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार, दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीला आला होता. धरणगाव पोलीसांनी संशयित आरोपीला अटक केली होती. मंगळवारी दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी न्यायालयात हजर करण्यासाठी आले असता शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने संशयित आरोपीला काळे फासून चोप देण्याचा प्रयत्न झाला. परंतू पोलिसांच्या सतर्कतेने महिलांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे.

याबाबत माहिती अशी की, “धरणगाव शहरातील एका भागात संशयित आरोपी चंदुलाल शिवराम मराठे ( वय – ६२) याची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता आपल्या आठ आणि सहा वर्षाच्या बालिकांसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आली. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. दळण दळून त्यांची आई घरी निघून गेली. त्यानंतर संशयित आरोपी चंदुलाल मराठे याने सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचे मुलीच्या आईच्या लक्षात आले. पीडीत मुलीच्या आई व वडीलांना धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चंदुलाल मराठे याच्यावर पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी व पथकाने रात्री उशीरा संशयिताला अटक केली. पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी, २२ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायालयाच्या समोर संशयित आरोपीला काळे फासण्यासाठी व चोप देण्यासाठी ठाण मांडून बसल्या होत्या.

दरम्यान सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास न्यायालयीन कामकाज आटोपल्यानंतर संशयित आरोपी चंदुलाल मराठे याला घेवून जात असतांना शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शोभा चौधरी, सरिता माळी-कोल्हे यांच्यासह इतर महिलांनी पोलीस वाहनावर धाव घेतली. परंतू पोलीसांनी गांर्भीय लक्षात घेवून संशयिताला आरोपी चंदूलाल मराठे याला पोलीस संरक्षण देत पुढील कारवाईसाठी रवाना करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसेना महिलांना संताप व्यक्त केला होता.

हेही वाचा ;

Back to top button