‘गुगल’ ने शोधली बेपत्ता मुलगी ; कसे ते तुम्हीच पहा

file photo
file photo

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : वडिलांसोबत फिरायला गेलेली 11 वर्षीय मुलगी शनिवारी (दि.१२) रात्री बेपत्ता झाली होती. सुमारे चार तास शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने पोलिसांनी 'गुगल'ची मदत घेतली. गुगलेनेही पोलिसांना निराश न करता अवघ्या अर्धा तासात बेपत्ता मुलीचा शोध घेतला. मुलीचा शोध घेणारा गुगल तुम्ही समजताय तो नसून शहर पोलिस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील श्वान आहे.

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर नगर परिसरातील 11 वर्षीय मुलगी रात्री दहा नंतर तिच्या वडिलांसोबत फिरायला गेली होती. काम असल्याने वडिलांनी तिला घरी जाण्यास सांगितले. काही वेळाने वडील घरी गेले त्यावेळी मुलगी घरात दिसली नाही. मुलीचा शोध सुरू झाला. ११ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना समजली. घटनेची माहिती समजताच उपनगर पोलिसांनी बेपत्ता मुलीचा शोध सुरू केला. मुलीचा शोध तिच्या घराजवळील परिसरातच सुरू होता.

नातलग आणि पोलिसांनी परिसरातील बहुतांशी घर, टेरेस, मैदान, इमारतींच्या गच्ची सर्व ठिकाणी मुलीचा शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. रात्री १२.३० च्या सुमारास पोलिसांनी गुगलची मदत घेण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी गुगलला घटनास्थळी बोलवले. गुगलला बेपत्ता मुलीच्या कपडे व चपलांचा वास दिला. त्यानंतर गुगलेने त्याची जबाबदारी चोख बजावली. वडिलांनी मुलीला जेथे सोडले तेथून गुगलने मुलीचा मार्ग काढला. मुलगी ज्या मार्गाने गेली तसाच मार्ग गुगलने दाखवला. परिसरातीलच अंधारातून मुलगी घाबरलेल्या अवस्थेत सापडली. पोलिसांना आणि पालकांना पाहून मुलीच्या चेहऱ्यावरील भीती दूर झाली. पोलिसांनी मुलीची प्राथमिक चौकशी करून तिला पालकांच्या ताब्यात सोपवले.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news