Tunnel Accident : मध्य प्रदेशमध्ये बोगद्याखाली ७ मजूर अडकले, बचावकार्य सुरू | पुढारी

Tunnel Accident : मध्य प्रदेशमध्ये बोगद्याखाली ७ मजूर अडकले, बचावकार्य सुरू

कटनी ; पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशातील कटनी येथील नर्मदा खोरे प्रकल्पाच्या बोगद्यात सात मजूर पडल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान झालेल्या अपघातात अडकलेल्या सात मजुरांची सुटका करण्यात आली आहे. कटनीच्या जिल्हाधिकारी प्रियांका मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली. ज्यांना बाहेर काढण्यात आले आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही त्या म्हणाल्या. (Tunnel Accident)

शनिवारी बोगद्याचा काही भाग कोसळला, त्यात ९ मजूर गाडले गेले. स्लेमनाबाद भागातील NH-30 च्या तळातून हा बोगदा बाहेर आला होता, ज्यामध्ये हा अपघात झाला.

सध्या राष्ट्रीय महामार्गाचा भाग खराब झाल्यामुळे वळवून दुरुस्तीचे काम सुरू होते. याच दरम्यान हा अपघात झाल्याचे समोर आले. बोगद्यातील दुर्घटनेनंतर प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. (Tunnel Accident)

मोनिदास कोळ, दिपक कोळ, नर्मदा कोळ (रुग्णालयात दाखल), विजय कोळ, इंद्रमणी कोळ, नंदकुमार यादव, मोतीलाल कोल, गोरेलाल कोळस, रवि नागपुरे पर्यवेक्षक सुपरवायझर यामध्ये नऊ जण अडकले होते.

Back to top button