चांदवड : वानराने मांडला होता उच्छाद, अखेर सोडले निसर्गाच्या अधिवासात | पुढारी

चांदवड : वानराने मांडला होता उच्छाद, अखेर सोडले निसर्गाच्या अधिवासात

चांदवड : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आसरखेडे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उपद्रव करणाऱ्या वानरास वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने पकडून अखेर निसर्गाच्या अधिवासात सोडले. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

आसरखेडे येथे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वानराने चांगलाच उच्छाद मांडला होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या सरपंच, पोलिसपाटील व ग्रामस्थांनी याची माहिती वनअधिकाऱ्यांना दिली. वनकर्मचाऱ्यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते सर्वांना हुलकावणी देत होते.

अखेर चांदवडचे सहायक वनसंरक्षक सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे, वडनेर भैरवचे वनपरिमंडळ अधिकारी देवीदास चौधरी, चांदवडचे वनपरिमंडळ अधिकारी प्रकाश सोमवंशी, नाशिकचे वनरक्षक थोरात, वडाळीभोईच्या वनरक्षक पूनम साळवे, वडनेर भैरवचे वनरक्षक विजय टेकनर, पारेगावचे वनरक्षक वाल्मीक व्हरगळ, मेसनखेडे वनरक्षक सुनील खंदारे, कानडगाव वनरक्षक सुयोग वाजे, नाशिक इको संस्थेचे अभिजित महाले, वनसेवक वसंत देवरे, सुरेश डुकरे, वाहनचालक अशोक शिंदे यांच्या पथकाने वानरास पकडून चांदवड येथील वनवसाहतीत नेले. गुरुवारी (दि. १०) पशुधन विकास अधिकारी डॉ. आहेर यांनी वानराची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यास निसर्गाच्या अधिवासात सोडले.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button