जळगाव : 12 लाखांच्या मुद्देमालासह वाहने जप्त, पोलिसांची धडाकेबाज कारवाई | पुढारी

जळगाव : 12 लाखांच्या मुद्देमालासह वाहने जप्त, पोलिसांची धडाकेबाज कारवाई

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यांत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत 12 लाखांच्या मुद्देमालासह मोटर सायकल, ओमनी कार जप्त करण्यात आली आहे. यासह 42 गुन्हे राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाने दाखल केले आहे.

मुद्देमाल जप्त,www.pudhari.news

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अं. व दक्षता उषा वर्मा तसेच विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक सिमा झावरे यांच्या आदेशानुसार गावठी हातभट्टी दारुचे समुळ उच्चाटन करण्यासाठी जानेवारी महिन्यात भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, यावल व रावेर तालुक्यांत धडक कारवाई केली. विभागीय निरीक्षक भुसावळ सुजित ओं. कपाटे यांच्या पथकाने अवैध ढाबे, हाटभट्टी दारु निर्मीती व विक्री केंद्रे, हातभट्टी दारु वाहतुक तसेच बनावट मद्य निर्मीती, विक्री व वाहतुक करणा-यांवर छापे टाकून ४२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

त्यात ३४,२०० लिटर रसायन, ६५३ लिटर गावठी हातभट्टी दारु, १६९.०२ लिटर देशी मद्य, ७२.१६ लिटर विदेशी मद्य, ५५.४९ लिटर बियर, १३१.४० लिटर बनावट विदेशी मद्य, ओमनी कार तीन मोटरसायकल असा 12 लाख  2 हजार 977 किमतीचा मुद्देमाल मिळून आलाव असून आरोपींवर मुंबई दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहे. या कारवाईत विभागीय निरीक्षक सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक राजेश नि. सोनार, दुय्यम  निरीक्षक यावल सत्यविजय फ. ठेंगडे तसेच विभागिय निरीक्षक पथकाचे सागर देशमुख, सहा. दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान विठ्ठल हाटकर, योगेश राठोड यांनी कारवाई केली. गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक, सुजित ओं. कपाटे, दुय्यम निरीक्षक, राजेश नि. सोनार व दुय्यम निरीक्षक, सत्यविजय ठेंगडे हे करीत आहेत.

या पुढेही अशा प्रकारच्या अवैध हातभट्टी दारु निर्मिती व विक्री तसेच अवैध मद्यविक्री ढाब्यांविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया सुरुच राहतील. – सुजित ओं. कपाटे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ 

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button