शीतलहरींचा वेग मंदावल्याने थंडीचा जोर ओसरला; मात्र, हवामान खात्याचा अवकाळीचा इशारा | पुढारी

शीतलहरींचा वेग मंदावल्याने थंडीचा जोर ओसरला; मात्र, हवामान खात्याचा अवकाळीचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उत्तर भारतामधून येणार्‍या शीतलहरींचा वेग मंदावल्याने थंडीचा जोर ओसरला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. नाशिक शहरात शुक्रवारी (दि.21) पारा 12.3 अंश सेल्सियस इतका नोंदविण्यात आला. गेल्या आठवड्यात राज्यातील अवकाळी व गारपीट तसेच उत्तर भारतामधून येणार्‍या थंड वार्‍यांमुळे नाशिक जिल्ह्यातील पार्‍यात लक्षणीय घट झाली होती. परिणामी जिल्हावासीयांना हुडहूडी भरली होती. दिवसाही हवेतील आर्द्रता कायम असल्याने नागरिक उबदार कपड्यांची मदत घेत होते. मात्र, गेल्या 48 तासांपासून जिल्ह्यातील हवामान कोरडे झाले आहे. परिणामी हवेतील गारठाही कमी झाला आहे. दरम्यान, 23 व 24 तारखेला राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा ;

Back to top button