

Ladki Bahin Yojana eKYC: सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे. दर महिन्याला मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे महिलांना घरखर्च, मुलांच्या गरजा आणि वैयक्तिक खर्च सहज भागवता येत आहेत.
पण अलीकडेच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अनेक महिलांची e-KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांचा पुढील हप्ता थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की e-KYC पूर्ण नसेल तर योजनेचा पैसा मिळणार नाही.
नैसर्गिक आपत्ती, नेटवर्क समस्या आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक महिलांना e-KYC वेळेत करता आली नाही. आधी याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 होती. परंतु लाखो महिलांची अडचण लक्षात घेऊन सरकारने ही मुदत वाढवून 31 डिसेंबर 2025 केली आहे. त्यामुळे महिलांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, अजूनही अनेक महिलांनी e-KYC केली नाही.
योजनेचा प्रत्येक रुपया पात्र महिलेलाच मिळावा असा सरकारचा हेतू आहे.
सरकारला एका नावाने दोन-दोन अर्ज, चुकीची बँक माहिती, काही ठिकाणी खोट्या नोंदी आढळून आल्या होत्या. म्हणून आधारद्वारे e-KYCअनिवार्य करण्यात आली आहे. सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे, e-KYC शिवाय कोणत्याही खात्यात रक्कम जमा होणार नाही.
फक्त मोबाइलवर काही सेकंदात तपासता येतं
पोर्टल उघडा - ladakibahin.maharashtra.gov.in
e-KYC पर्यायावर जा
तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरा
Send OTP करा
स्क्रीनवर पुढीलपैकी एक मेसेज दिसेल—
e-KYC already completed = e-KYC झाली आहे.
Aadhaar number is not in the eligible list = तुमचं नाव लिस्टमध्ये नाही.
Complete your e-KYC = प्रक्रिया बाकी आहे.
सरकारच्या नियमांनुसार ज्यांची e-KYC शिल्लक राहील, त्यांना सिस्टम Pending किंवा Inactive मध्ये टाकेल आणि त्यांना पुढील हप्त्याचे पैसे खात्यात येणार नाहीत. म्हणूनच, 31 डिसेंबर 2025 पूर्वी e-KYC पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.