मुंबई : पुढारी वृत्तसेवा
भाजपचे नेते आशिष शेलार यांना त्यांच्या कुटुंबियांसह जीवे ठार मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशिष शेलार यांना अज्ञात व्यक्तीने दोन वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल करुन शिविगाळ करत धमकावले. त्याने आशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली असून पोलिसांनी धमकी देणाऱ्या या मोबाईल धारकाचा शोध सुरू केला आहे.
हे ही वाचा :