जळगाव : मोलकरणीवर अत्याचार, वकिलाविरूध्द गुन्हा दाखल | पुढारी

जळगाव : मोलकरणीवर अत्याचार, वकिलाविरूध्द गुन्हा दाखल

जळगाव :  पुढारी वृत्तसेवा
घरकाम करणार्‍या मोलकरणीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍या वकिलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश साहेबराव गवई (रा. श्यामनगर) असे त्‍याचे नाव आहे. दरम्यान, या वकिलावर आधी सरकारी अभियोक्ता असतांना ‘एसीबी’ने कारवाई देखील केली होती अशी माहिती समोर आली आहे.

राजेश साहेबराव गवई (रा. श्यामनगर) या वकिलाच्या घरी पीडित महिला मोलकरणी म्हणून काम करीत होती. त्याने पीडितेशी प्रेमसंबंध निर्माण केले. पीडितेच्या पतीस देखील त्याने या संबंधांची माहिती दिली. त्यामुळे पतीने पीडितेशी नाते तोडले. त्यानंतर गवईने पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली.त्या महिलेचे आधी चित्रीत केलेले व्हिडीओ व्हायरल करण्‍याची धमकी देवून तिची बदनामी देखील केली.पीडित महिलेने मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गवईच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार विनयभंग व आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलं का? 

 

Back to top button