धुळे : राष्ट्रवादीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला घातला दुग्धाभिषेक | पुढारी

धुळे : राष्ट्रवादीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला घातला दुग्धाभिषेक

धुळे, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणाचे धुळ्यात तीव्र पडसाद उमटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला असून शिवसेनेने आज प्रतिकात्मक पोस्टरचे दहन केले आहे. कर्नाटक सरकारने तातडीने विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना करण्यात आली. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार धुळ्यात आंदोलन करण्यात आले. धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील बारा पत्थर चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. पुतळ्याची विटंबना करणारे समाज कंटक व या घटनेला किरकोळ असा उल्लेख करणाऱ्या नेत्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी राजेंद्र चीतोडकर,जावेद मण्यार,असलम खाटीक ,बाबा कादरी, अमिन शेख,राज कोळी, संदीप पाटील, महेंद्र बागुल, ज्ञानेश्वर माळी, सरोजताई कदम ,करुणाताई पाटील, निखिल मोनिया, महेंद्र शिरसाट ,राजेंद्र चौधरी, सलीम  लंबू ,राजेंद्र सोलंकी, रईस कादरी, एजाज शेख, अमीत शेख, आयुष काकडे, आकाश विभुते, प्रणव भोसले, ऋतिक पोळ आदी उपस्थित होते.

दरम्यान आज शिवसेनेने देखील कर्नाटक सरकारच्या या संदर्भातील कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख मनोज मोरे, माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी, संजय वाल्हे, संघटक धीरज पाटील, विनोद जगताप, महादू गवळी आदींनी पुतळा विटंबनेसंदर्भात चुकीचे वाक्यं वापरणारे कर्नाटक सरकारच्या संबंधित मंत्र्याच्या प्रतिकात्मक पोस्टरचे दहन करण्यात आले.

हे वाचलंत का? 

Back to top button