Madhuri Dixit IFFI : ‘ओटीटी मुळे जगभरातील सिनेमांशी जोडले गेलो’ | पुढारी

Madhuri Dixit IFFI : 'ओटीटी मुळे जगभरातील सिनेमांशी जोडले गेलो’

पणजी; पुढारी वृत्तसेवा

कोविडचा काळ सर्वांसाठीच खूप वाईट गेला आहे. मात्र या काळात ओटीटी व्यासपीठानी लोकांचे उत्तम मनोरंजन केले आहे. जगभरातील सिनेमांशी यामुळे जुळवून घेता आले. प्रत्येक देशाच्या संस्कृतीपासून भावनांपर्यंत खूप गोष्टी त्यांच्या सिनेमांमुळे अनुभवता आल्या, असे त्या म्हणाल्या. (Madhuri Dixit in IFFI)

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये संपन्न झाला. सांगता समारोपासाठी प्रमुख अतिथी म्हणून माधुरी दीक्षित उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी रेड कारपेटवर माध्यमांशी संवाद साधला. (Madhuri Dixit in IFFI)

International Film Festival : सिताऱ्यांच्या झगमगाटात इफ्फीचा समारोप; प्रसून जोशींना पुरस्कार

आता हळूहळू सर्व खुले झाले आहे. याचा आनंद आहे मात्र काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व नियम पाळून या गोष्टींचा आनंद घ्या असेही त्यांनी सांगितले.

तसेच इफ्फीमध्ये सिनेक्षेत्रातील दिग्गजांना भेटता येते. चित्रपटांशी संबंधित विविध विषयावर चर्चा होतात. हा माहौल खूप ऊर्जादायी असतो असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

कोरोनाचा नवा व्हेरियंट: केंद्रीय गृहमंत्रालयाची आपत्कालिन बैठक

Back to top button