omicron corona : कोरोनामुळे १५ डिसेंबर सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान सेवेला लागणार ब्रेक? | पुढारी

omicron corona : कोरोनामुळे १५ डिसेंबर सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान सेवेला लागणार ब्रेक?

पुढारी ऑनलाईन डेस्क : omicron corona : १५ डिसेंबर २०२१ पासून नियमित आंतरराष्ट्रीय हवाई सेवेला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रसरकारकडून देण्यात आली होती. याबाबत मागच्या दोन दिवसांपुर्वी हवाई वाहतूक मंत्रालयातील सूत्रांनी अशी माहिती दिली होती. दक्षिण अफ्रिकेत कोरोनाचा नवा ओमीक्रॉन व्हेरियंट सापडल्याने आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू करण्याबाबत नव्याने विचार करणार असल्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले.

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन व्हेरियंट सध्या आफ्रिकेत आढळला असून अन्य ११ देशांमध्येही त्याचा फैलाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्कालिन बैठक बोलविली. या बैठकीत विमान उड्डाण्णांसह कठोर निर्बंधांबाबत चर्चा झाली.

omicron corona : ओमिक्रॉन व्हेरियंटचा फैलाव झाल्यास तिसरी लाट वेगाने

ओमिक्रॉन व्हेरियंटचा फैलाव झाल्यास तिसरी लाट वेगाने येण्याचा धोका आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या ठराविक देशांमध्ये सुरू असलेली विमानसेवा या व्हेरियंटचा फैलाव करू शकते. त्यामुळे त्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या मार्च महिन्यात ही सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर वेळोवेळी ही बंदी वाढविण्यात आली होती.

मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई सेवा बहाल केली जाणार असल्याचे अलीकडेच केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते.

यावर पुन्हा विचार होणार असल्याचे मंत्रायलाकडून सांगण्यात आले.

झालेल्या बैठकीमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत योग्य त्या उपाययोजना करणार असल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. याचबरोबर भारतातील आंतराष्ट्रीय विमानतळांवर प्रवाशांच्या कोरोना चाचण्या करणार आहे.

ज्या देशांमध्ये कोरोनाचा मोठा फैलाव झाला आहे. त्या देशातून येणाऱ्या नागरिकांची विशेष खबरदारी घेणार आहे.

अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेकडे जाणाऱ्या राष्ट्रांना तात्पुरती उड्डाणे स्थगित केली आहेत. इस्रायलने सर्व परदेशी प्रवाशांसाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत.

तर ब्रिटीश राष्ट्रांनी ३० नोव्हेंबरपासून सर्व आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे.

दिल्लीसह अनेक भारतीय राज्यांनी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि हाँगकाँग सारख्या देशात ओमिक्रॉनचा नवा विषाणू सापडला आहे.

त्या देशातून येणाऱ्यांची RT-PCR चाचणी बंधणकारक केली आहे.

Back to top button