नाशिक; पुढारी वृत्तसेवा
पूर्वीच्या राजकारण्यांमध्ये नम्रता होती. सर्वजण एकमेकांचा आदर करायचे. अलिकडे पुढारी नमस्कारही करत नाहीत. यांच्या बापाचे काय जाते तेच कळत नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांनी राजकीय संस्कृतीवर टीका केली. सरकार जाण्यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसलेत, अशीही टीकाही त्यांनी यावेळी केली. नाशिकमधील कळवण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, कोण काय काय बोलतो ही काय महाराष्ट्रची संस्कृती आहे का? कोणी बस फोडतोय… असे करू नका.
पूर्वी राजकारण्यांमध्ये नम्रता होती. अलीकडे पुढारी नमस्कार सुद्धा करत नाही, काय त्यांच्या बापाचे जाते कळत नाही. कोणीही तांब्रपत्र घेऊन येत नाही. सत्ता येते आणि सत्ता जाते. आपण जमिनीवर राहिले पाहिजे, असेही पवार म्हणाले. (DyCM Ajit Pawar)
हेही वाचलं का?