जळगाव जिल्हा बँकेत प्रस्थापितांचा वर्ग तयार झाला आहे : डी. जी. पाटील | पुढारी

जळगाव जिल्हा बँकेत प्रस्थापितांचा वर्ग तयार झाला आहे : डी. जी. पाटील

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा मध्यवर्ती बँक प्रस्थापितांचा एक वर्ग तयार झालेला आहे. या प्रस्थापिताच्या वर्गाला आव्हान देण्यासाठी शेतकरी विकास पँनल तयार केले आहे. ही बँक सर्वसामान्य माणसाची आहे. गर्भ श्रीमंताची कारस्थान उथळून लावण्यासाठी हे पॅनल उभे केले असल्याचे कॉग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा पक्षातील काही समविचारी लोकांनी एकत्रित येऊन शेतकरी विकास पॅनल तयार केले आहे. यात अरुणा दिलीपराव पाटील (काँग्रेस), विकास मुरलीधर पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), कल्पना शांताराम पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), रवींद्र सूर्यभान पाटील (भारतीय जनता पार्टी), राजू रघुनाथ पाटील सुरेश शांताराम पाटील या उमेदवारांचा सहभाग आहे.

आज मंगळवारी (दि.९) रोजी शेतकरी विकास पॅनलची पत्रकार परिषद घेऊन आपल्या शेतकरी विकास पॅनलची भूमिका स्पष्ट केली. यात काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर थेट निशाणा साधला.

या पत्रकार परिषदेत जिल्हा मध्यवर्ती बँकेत सातत्याने तीच मंडळी दिसत आहेत. हे गर्भ श्रीमंताचे कारस्थान आहे. हे कारस्थान उलथून लावण्यासाठी शेतकरी विकास पॅनल तयार करण्यात आले आहे. काँग्रेसची उमेदवारी मागणारे विकास वाघ, अविनाश भालेराव, रघुनाथ पाटील, डॉक्टर सुरेश पाटील या उमेदवारांना उमेदवारी न देता काँग्रेसची काहीही संबंध नसलेल्या शैलजा निकम यांना उमेदवारी दिली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर आजपर्यंत दिसल्या नसल्याचा दावा डीजे पाटलांनी केला आहे. तर यावलचे विनोद पाटील हे काँग्रेसचे सभासद सुद्धा नसल्याचा त्यांनी यावेळी दावा केला.

आमदार, खासदार ही तेच आणि जिल्हा बँकेत ही तेच यात खुर्चीसाठी यांचा एवढा अट्टाहास का? असा प्रश्न यावेळी पाटील यांनी उपस्थित केला. एकनाथराव खडसे अनेक वर्षापासून जिल्हा बँकेत संचालक आहे. तर त्यांची मुलगी सुद्धा या बँकेत चेअरमन आहे. एकाच घरात एकापेक्षा जास्त पद एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी का देत नाही? असाही प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button