रायगडावर जाताना शिवभक्‍त पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्‍यू! - पुढारी

रायगडावर जाताना शिवभक्‍त पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्‍यू!

नाते (रायगड) ; पुढारी वृत्‍तसेवा

आज (मंगळवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी मुंबई येथून आलेल्या धर्मेंद्र तानवडे या पंचेचाळीस वर्षीय शिवभक्त पर्यटकाला महादरवाजातून पुढे पायी जात असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्याला तातडीने पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून त्याला पुढील उपचारासाठी महाड येथील डॉ आदित्य महामणकर यांच्या रुग्णालयात आणले असता, त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.

धर्मेन्द्र तानवडे हे आपल्या कुटुंबियांसमवेत किल्ले रायगडावर जात होते. त्यांना झालेल्या त्रासानंतर स्थानिक रायगड गाईडच्या चमूने एसआयएस सिक्युरिटीज एस व केंद्रीय पुरातत्त्व विभाग तसेच रोपवेच्या मदतीने पाचाड ग्रामीण रूग्णालयात आणण्याची व्यवस्था केली. मात्र दुर्देवाने तानवडे यांचा मृत्‍यू झाला.

मागील काही वर्षांत किल्ले रायगडावर हृदयविकाराच्या झटक्याने व अन्य अपघाताने मृत्युमुखी पडणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. किल्ले रायगडावर अतिरिक्त आरोग्य व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह शिवभक्त पर्यटकांकडून केली जात आहे.

Back to top button