नाफेडकडून कमी दराने कांदा खरेदी, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष | पुढारी

नाफेडकडून कमी दराने कांदा खरेदी, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख टन कांदा २४१० रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला प्रत्येक क्विंटल २२७४ रुपये इतकाच दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

दुसरीकडे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही प्रमाणात कांद्याचे दर वाढल्याचे दिसले मात्र नाफेडने कांदा दर वाढवण्याच्या ऐवजी 125 रुपये प्रतिक्विंटल कांदा दर कमी केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने नाफेड मार्फत 2410 प्रतिक्विंटल ने कांदा खरेदी केला जाईल असे जाहीर केले मात्र आठ ते दहा दिवसांमध्येच त्यांनी कांदा खरेदीचा दर कमी करत 2274 रुपये प्रतिक्विंटल असा केल्याने फसवणूक झाल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button