South Africa Fire : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये इमारतीत भीषण अग्नितांडव; ५८ जणांचा होरपळून मृत्यू; ४३ जखमी | पुढारी

South Africa Fire : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये इमारतीत भीषण अग्नितांडव; ५८ जणांचा होरपळून मृत्यू; ४३ जखमी

पुढारी ऑनलाइन डेस्क : South Africa Fire : दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये इमारतीला आज गुरुवारी पहाटे आग लागली. अल्पावधीतच आगीने रौद्ररुप धारण केले. या अग्नितांडवात आतापर्यंत ५८ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ४३ जण जखमी आहे. अग्निशामक दलाने आगीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याची माहिती दिली आहे.

जोहान्सबर्ग शहर आपत्कालीन व्यवस्थापन सेवांचे प्रवक्ते, रॉबर्ट मुलाउडझी यांनी, X वर पोस्ट केले, “नवीनतम अपडेट 58 मृतदेह बाहेर काढले आणि 43 जखमी आहेत. अजूनही शोध आणि बचावकार्य सुरू आहेत. घटनास्थळी उपचार घेतलेल्या अनेक रुग्णांना पुढील वैद्यकीय सेवेसाठी विविध आरोग्य सेवा सुविधांमध्ये नेण्यात आले, असे मुलाउडझी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढे माहिती दिली आहे.

इंडिया टुडेने याची माहिती दिली आहे. असोसिएटेड प्रेसच्या बातमीनुसार, आपत्कालीन व्यवस्थापन सेवांनी सांगितले की, गुरुवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत आणखी ४३ लोक जखमी झाले आहेत. South Africa Fire

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आगीचे कारण आणि नुकसानीचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, आग मोठ्या प्रमाणावर विझवण्यात आली असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तर स्काय न्यूजच्या माहितीनुसार या दुर्घटनेत ५२ लोक मृत्युमुखी पडले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button