Nashik : सात वर्षांत नाशिक शहरात वाहन तोडफोडीचे १५९ गुन्हे | पुढारी

Nashik : सात वर्षांत नाशिक शहरात वाहन तोडफोडीचे १५९ गुन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रात्री-अपरात्री वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये तोडफोड, जाळपोळ प्रकरणी १६० गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ११६ गुन्ह्यांची उकल झाली असून, उर्वरित ४४ गुन्ह्यांमधील आरोपींची ओळख पटलेली नाही.

शहरात सिडको परिसरात युवकाच्या खुनानंतर संतापात काही अल्पवयीन मुलांनी वाहनांची तोडफोड करून दहशत करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे शहरातील विविध परिसरांमध्येही असेच झाले असून, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. टवाळखोर, गुन्हेगारांकडून वाहनांची तोडफोड, जाळपोळ केली जात असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरते. त्यामुळे असे गुन्हे रोखण्यासाठी व गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून रात्र गस्त वाढवली जाते. मात्र अनपेक्षित ठिकाणी हे गुन्हे घडत असल्याने त्यावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात आलेले नाही. सर्वाधिक वाहन तोडफोडीच्या घटना अंबड, पंचवटी, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे चित्र आहे. काही घटनांमध्ये शेजारचे वाद किंवा कौटुंबिक वादाची किनार आहे. मात्र बहुतांश गुन्ह्यांमध्ये सराईत गुन्हेगारांनी किंवा टवाळखोरांनी दहशत पसरवण्यासाठी हे गुन्हे केल्याचे समोर आले आहे.

वाहन ताेडफोड, जाळपोळीच्या घटना

वर्ष : दाखल गुन्हे

२०१७ : २०

२०१८ : २७

२०१९ : ३४

२०२० : २९

२०२१ : १९

२०२२ : १५

२०२३ : १६

हेही वाचा :

Back to top button