

सातपूर : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर रोड येथील सकाळ सर्कल येथे रविवारी रात्री झालेल्या अपघातात महानगरपालिकेचा कर्मचारी मयुर काळे (वय ४६, यांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काळे हे त्र्यंबक रोडकडून रविवारी रात्री दहा वाजता सिडको येथे घरी चालले होते. त्यात सकाळ सर्कल येथील डिव्हायडरला चार चाकी वॅग्नर वाहन धडकले. त्यात कर्मचारी काळे हे जखमी झाले होते. खासगी दवाखान्यात दाखल केले असता, सोमवारी सकाळी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सातपूर पोलीस स्टेशन जवळील चौकात अनेक अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. नागरिकांनी वारंवार येथे सिग्नल बसवण्याची मागणी देखील केली आहे. मात्र अद्यापही सिग्नल बसवण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी योग्य उपाय योजवे अशी मागणी केली आहे.
पुढारी न्यूज – सॅटेलाईट चॅनल आजपासून लोकसेवेत
हेही वाचा :