परराज्यातील पाच जणांनी एकास घातला गंडा | पुढारी

परराज्यातील पाच जणांनी एकास घातला गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चेन्नईमधील संशयितांनी नाशिकमध्ये आयटी कंपनी सुरू करून सहकाऱ्यास आर्थिक मोबदला न देता गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयितांनी तब्बल एक कोटी ६५ लाखांचा गंडा घातला असून, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चेन्नई येथील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

समील एम. चव्हाण (रा. मुंबई नाका) यांच्या फिर्यादीनुसार, संशयितांनी स्वामी एंटरप्रायजेस या कंपनीमार्फत काम सुरू केले होते. चव्हाण यांच्यासोबत झालेल्या कराराअंतर्गत ठरल्याप्रमाणे वीजमीटरचे रीडिंग घेऊन त्याचा मोबदला संशयितांनी देणे अपेक्षित होते. परंतु संशयितांनी कमी मोबदला दिला. तसेच एक कोटी ६५ लाख ६२ हजार ३५७ रुपये नं देता संशयित पसार झाले. हा प्रकार १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२३ या दरम्यान घडला. लेकू रेड्डी राजगोपाल (५८), मधुराम राजगोपाल (५५), अंजली राजगोपाल (३०), राजू जगन्नाथन (४७), मनीष जोशी (४०, सर्व रा. सिपकोट, आयटी पार्क, सिरुसेरी, चेन्नई) अशी फसवणूक करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button