मोक्का ‘अब तक 50’! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची टोळीवर कारवाई | पुढारी

मोक्का ‘अब तक 50’! पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची टोळीवर कारवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सामान्य नागरिकांना, तसेच शहराची सामाजिक शांतता भंग करणार्‍या व गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या टोळ्यांवर मोक्का कारवाईचा धडाका सुरूच आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्काचे अर्धशतक पूर्ण केले आहे.
यामध्ये तब्बल 242 गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. तत्पूर्वी अगोदरच्या दोन वर्षांतदेखील तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 114 टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली होती. त्यामुळे शहरात तब्बल 156 टोळ्यांवर मागील अडीच ते तीन वर्षांत कारवाई झाल्याचे व गुन्हेगारीच्या दीडशेहून अधिक टोळ्या असल्याचेही यामुळे स्पष्ट झाले आहे.

अभिषेक ऊर्फ अभि रमेश तांबे (वय 21, रा. धानोरी), सुमित नागेश लांडगे (वय 25) व प्रज्वल प्रशांत शिंदे (वय 18) अशी पन्नासवी कारवाई झालेल्या टोळीचे नाव आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून पुण्यातील तब्बल 50 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. जुने वाद, परिसरातील वर्चस्व वाद व दोन गटांतील वादातून खून, खुनाचे प्रयत्न आणि दहशत माजविण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यानंतर पोलिसांकडून मोक्कासारखी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

येरवडा पोलिस ठाण्याकडून प्रस्ताव
अभिषेक तांबे टोळीचा प्रस्ताव येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक कांचन जाधव यांनी तयार करून तो प्रस्ताव नंतर पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासमोर ठेवला होता. त्याला पोलिस आयुक्त आणि सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा :

Talathi Exam : तलाठी परिक्षा असलेल्या काही केंद्रांवर सर्व्हर डाऊन; लाखो परीक्षार्थी खोळंबले

पुणे : सराईत चोरट्याकडून तीन दुचाकी जप्त

Back to top button